|
所在平台: Udemy |
课程主页: https://www.udemy.com/course/cyber-forensic-4/
课程评论:没有评论
Coursera 上的“印地语和马拉地语直播”课程概述 该课程探讨了直播(也被称为“实时流媒体”)作为一种日益流行的社交媒体沟通形式。与预先录制和编辑的媒体不同,直播内容在被创建时即可被观看,从而提供了一种真实且即时的体验。 该课程重点介绍了直播的几个关键优势: * **扩大受众范围:** 直播能够轻松连接来自世界各地的人们,从而显著扩大潜在受众。 * **提高参与度:** 直播允许与观众进行实时互动,包括回答问题和进行交流,从而提高参与度和粘性。 * **通知和发现:** 开始直播时会发送通知,吸引联系人观看,并且由于直播通常是公开的,新观众可以轻松加入。 * **推广和营销:** 直播是一种有效的工具,可以推广频道、品牌或业务。 * **成本和时间效益:** 与传统录制和编辑相比,直播更经济高效,并且可以节省时间。 该课程还强调了直播在业务领域的多功能性: * **业务扩展:** 企业家可以使用直播进行网络研讨会、采访和其他活动,以触达更广泛的受众。 * **人际关系建设:** 直播提供了一个直接与客户建立联系的机会,促进真诚的互动,从而培养客户忠诚度。 * **产品演示:** 可以通过直播有效地展示产品并实时回答潜在客户的疑问。 * **培养亲和力:** 直播的互动性质能够建立一种亲密的联系,有助于业务增长。 课程还提到了用于商业直播的一些有益平台,例如 Branded site、Vimeo 和 LinkedIn Live。
सध्या, सोशल मीडिया वर लोकप्रियतेच्या शिखरावर असलेलं एक माध्यम म्हणजे ‘लाईव्ह स्ट्रीमिंग.' यालाच मराठीत ‘थेट प्रक्षेपण' असे म्हटले जाते. आपण एरवी जे टीव्ही वरील किंवा नेटवरील कार्यक्रम बघतो, ते आधी रेकॉर्ड/ शूट केलेले असतात. आपल्यापर्यंत येण्यापूर्वी ते हवे तसे एडिट केलेले असतात. पण, थेट प्रक्षेपणात असे होत नाही. ज्या वेळी ते रेकॉर्ड होत असतात, त्याचवेळी आपल्याला ते वाहिन्यांद्वारे तसेच्या तसे दाखवले जातात. म्हणूनच याला ‘थेट'(लाईव्ह) प्रक्षेपण म्हटले जाते.सोशल मीडिया वरील लाईव्ह स्ट्रीमिंग बर्याचदा प्रेक्षकवर्ग वाढवण्यासाठी केले जाते. इंटरनेट वर जगातील सर्व लोक एकमेकांशी जोडू शकतात, आणि ह्याच माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंग केल्याने आपला प्रेक्षक वर्ग खूप जास्त प्रमाणावर वाढू शकतो. ही पद्धत मोठ्या प्रमाणावर लोकांना आकर्षित करून घेण्यास अतिशय उपयुक्त आहे. यामुळे views वाढण्यास खूप मदत होते. कारण याद्वारे, आपल्या ऑडियन्ससोबत थेट संवाद केला जातो. त्यांच्याकडून विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तरे तात्काळ देणे आपल्यास शक्य असते. कुणीही लाईव्ह स्ट्रीमिंग चालू केले, की त्यांच्या कॉनटॅक्ट्स मधील सर्वांना नोटिफिकेशन जाते, ते पाहून लोक उत्सुकतेने उघडून पाहतात. तसे लाईव्ह हे सगळ्यांसाठीच खुले असल्याने, आणखीही लोक जोडले जाण्यास मदत होते. आपल्या चॅनल किंवा कोणत्याही कामाच्या प्रचारासाठी अनेक जण थेट प्रक्षेपण पद्धतीचा अवलंब करतात. तसेच, लाईव्ह स्ट्रीमिंग ही पद्धत फार खर्चिक नसल्यामुळे ती अनेकांना जास्त परवडते. यात आधीच्या रेकोर्डिंग्ज, एडिटिंग इत्यादींचा वेळ आणि खर्च दोन्हीही वाचतात. काही कंपन्या त्यांच्या नव्या कर्मचार्यांना ट्रेनिंग देण्यासाठी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स चा भाग म्हणून लाईव्ह स्ट्रीमिंग वापरतात.लाईव्ह स्ट्रीमिंगचा उपयोग अनेक बिझनेसमन त्यांच्या व्यवसायाची व्याप्ती वाढवण्यासाठी करून घेतात. यामध्ये वेगवेगळ्या विषयांवरचे वेबिनार्स, मुलाखती, इत्यादींचा उपयोग करून आपल्या व्यवसायास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविणे शक्य होते. लोकांशी थेट संबंध प्रस्थापित करण्याची संधी उपलब्ध होत असल्याने आपल्या व्यवसायाचा प्रचार करणे सोपे होते. आपल्या प्रोडक्टस बद्दल लाईव्ह स्ट्रीमिंग मधून आपण व्यवस्थित माहिती देऊ शकतो, तसेच, प्रेक्षक त्यांच्या शंका लगेचच विचारू शकतात. अश्या रीतीने एकमेकांशी संवाद होत असल्याने लोक लाईव्ह मध्ये गुंतून राहतात. तसेच, लाईव्ह मध्ये व्हिडिओ मधील व्यक्ती लोकांच्या स्तरावर येऊन त्यांच्याशी गप्पा मारत असल्यामुळे, तेही त्या व्यक्तिसोबत आरामात संवाद साधू शकतात. यामुळे, व्हिडिओ मधील बिझनेसमन आणि त्याचे ग्राहक यांच्यात एक प्रकारे आपुलकीचे नाते निर्माण होते, जे व्यवसायास प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाते. अश्या रीतीने कमी खर्चात व वेळात आपल्या व्यवसायाचा प्रचार करणे ह्या लाईव्ह स्ट्रीमिंग ने शक्य होते. Branded site, Vimeo, LinkedIn live, हे काही व्यवसायाच्या दृष्टीने फायद्याचे प्लॅटफॉर्म्झ आहेत.